Monday, April 25, 2022

क्रीडा शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार: बलात्कार व गंभीर मारहानीचा गुन्हा दाखल

  क्रीडा शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार: बलात्कार व गंभीर मारहानीचा गुन्हा दाखल 



मुंबई प्रतीनिधी. दि.२५


डोंबिवली येथे एका क्रीडा शिक्षकाने  विद्यार्थिनी वर अत्यार केल्याची घटना उघडकीस आली आहे.या क्रीडा शिक्षकाने  विद्यार्थिनीवर अत्याचार करत तिला अमानुष मारहाण केली आहे. याबाबत पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून मानपाडा पोलिसांनी या क्रीडा शिक्षकाला  बेड्या ठोकल्यात आहेत. रामेश्वर पाठक असे त्या शिक्साकाचे नाव  आहे. 

डोंबिवलीत राहणारी २७ वर्षीय पीडित तरुणी २०२२  साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. यावेळी तिचा क्रीडा शिक्षक असलेल्या रामेश्वर पाठक याने त्या तरुणीसोबत ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. काही कालावधीनंतर  दुसऱ्या मुलांशी बोलते म्हणून रामेश्वर हा या तरुणीला मारहाण करू लागला. या तरुणीला रामेश्वर याने १८ मार्च २०२२ रोजी  रॉडने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत पीडित तरुणीच्या पायाचे हाड मोडले . त्याच बरोबर त्या पिढीत तरुणीचे  अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं. अखेर या तरुणीने एका सहकाऱ्याच्या मदतीने मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. यानंतर मानपाडा पोलिसांनी रामेश्वर पाठक याच्याविरोधात बलात्कार, गंभीर मारहाण यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Featured Post

नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप

  नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले  रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप  नीरा : प्रतिनिधी       ...