मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे बिगूल वाजले.
मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे बिगूल वाजले. पुणे येथे पार पडली नियोजन बैठक पुणे दि.१८ आखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने घेण्यात येणारे 44 सावे राष्ट्रीय अधिवेशन पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन येथे डिसेंबरमध्ये होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने करावयाची पूर्वतयारी संदर्भात एक बैठक पुणे येथे नुकतीच पार पडली. होणारे अधिवेशन हे भव्यदिव्य असून अधिवेशनाच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडी-अडचणी प्रशासनासमोर तसेच जनतेसमोर मांडणे शक्य होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पुणे जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन पुणे जिल्ह्यात असल्याने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संघटनेतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे येथील जांभुळकर गार्डन येथे संपन्न झाली. परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख हे या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते.यावेळी...