भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार राहुल शिंदे यांना जाहीर. आर.पी.आय. आठवले गट व सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार राहुल शिंदे यांना जाहीर. 


आर.पी.आय. आठवले गट व सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. 



पुरंदर :

       पुणे जिल्हा डिजिटल मिडियाचे उपाध्यक्ष व पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे यांना यावर्षीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शाखा पुरंदर यांच्यावतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज दिवार यांनी दिली आहे. 



    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवा निमित्त सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन सासवड  येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी करण्यात येते. प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. उद्घाटन आर.पी.आय.चे प्रदेश सचिव सुर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरंदरचे आमदार व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे असणार आहेत. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कार वितरण होणार आहेत. मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा डिजिटल मिडियाचे उपाध्यक्ष व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांना आदर्श प्रशासकी सेवा पुरस्कार, आर.पी.आय.च्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुवर्णाताई डंबाळे यांना आदर्श सामाजिक सेवा पुरस्कार, हॉटेल स्वागताचे विनोद जगताप यांना आदर्श उद्योजक सेवा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. 



   जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून विद्रोही सां.च. महा. राज्य अध्यक्ष पार्थ पोकळे हे हिंदुत्व व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरंदर तालुका आर.पी.आय.चे अध्यक्ष व सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज धिवार करणार आहेत. कार्यक्रमाला आर.पी.आय.चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकबपू गायकवाड, भाजपचे बारामती लोकसभा अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, पी.डी.सी. बॅंकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


   रात्री ०८.३० ते ११ यादरम्यान साजन बेंद्रे व विशाल चव्हाण निर्मिती गाण्यांचा नजराणा या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार असल्याची माहिती आर.पी.आय.चे युवक अध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी दिली. 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..