आदर्श तालुका पत्रकार संघ परिषदेचे पुरस्कार जाहीर पुणे विभागातून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची निवड मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन

आदर्श तालुका पत्रकार संघ परिषदेचे पुरस्कार जाहीर पुणे विभागातून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची निवड मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचे दिवंगत अध्यक्ष वसंतराव काणे आणि रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या अनुक्रमे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज येथे घोषणा केली आहे. अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाला २०२४ चा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी विविध तालुका, जिल्हा संघांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यातून खालील तालुका संघांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.. १) पुणे विभाग : पिंपरी - चिंचवड तालुका पत्रकार संघ, जिल्हा पुणे, २) लातूर विभाग : उमरगा तालुका पत्रकार संघ, जिल्हा धाराशिव, ३) कोल्हापूर विभाग : कणकवली तालुका पत्रकार संघ, कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग, ४) संभाजीनगर विभाग-सेलू तालुका मराठी पत्रकार संघ, सेलू जिल्हा परभणी, ५) अमरावती विभ...