मराठी पत्रकार परिषदेची उपक्रमशीलता
नागपूरमध्ये ,शुध्द लेखनाचं महत्व', नगरमध्ये 'जागतिक छायाचित्र दिवस', तर सांगलीत 'डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी कार्यशाळा'.मुंबई :
उपक्रमशीलता हा मराठी पत्रकार परिषदेचा स्थायीभाव आहे. मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका संघाच्यावतीने राज्यभर सातत्यानं विविध आणि अभिनव उपक्रम सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून मागील आठवड्यात नागपूर जिल्हा संघाने शुद्धलेखन कार्यशाळा, नगर जिल्हा संघाने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकारांचा काल सत्कार, तर सांगली जिल्हा संघाने डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या तिन्ही उपक्रमशील जिल्हा शाखांचै अभिनंदन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले आहे.
'शुध्द लेखन' हा विषय आज दखल घ्यावा असा राहिला नाही असं मत व्यक्त केलं जातं. शुध्दलेखन महत्वाचे नाही आशय महत्वाचा आहे असंही अनेक जण बोलतात. मात्र आमच्या नागपूर जिल्हा संघानं पत्रकारांसाठी आणि आम जनतेसाठी शुद्धलेखन कार्यशाळेच्या माध्यमातून शुध्दलेखनाचं महत्व अधोरेखीत केलं. शुध्दलेखनाचं महत्व आणि आवश्यकता याची माहितीही दिली गेली. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी पत्रकार परिषद महिला आघाडीच्या राज्य प्रमुख शोभाताई जयपूरकर आणि त्यांच्या टीमचं या अनोख्या आणि अत्यावश्यक उपक्रमाबद्दल अभिनंदन.
काल जागतिक छायाचित्र दिवस. हजार शब्द जे काम करू शकत नाहीत ते काम एक छायाचित्र करते. मात्र छायाचित्रकार हा पत्रकारितेतील महत्वाचा घटक कायम उपेक्षित राहिला. छायाचित्रनाचे हे महत्व लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख, नगरचे अध्यक्ष सूर्यकांत नेटके, अधिस्वीकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम यांनी अहमदनगर मधील छायाचित्रकारांचा काल सत्कार करून त्यांच्या कार्याचं कौतूक केलं. सर्वांचं अभिनंदन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले आहे
सांगली जिल्हा पत्रकार संघ आणि डिजिटल मिडिया परिषदेच्यावतीने डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डिजिटल मिडियातील मित्रांना आजही print आणि इलेक्ट्रॉनिक्स मधील मित्र पत्रकार मानायलाच तयार नाहीत. मात्र हे आजचे प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच चॅनल्स असू देत मोठी दैनिक असोत त्यांनी आपल्या वेब आवृत्त्या सुरू केल्या आहेत. ते पाहूनच ग्रामीण भागात असंख्य पत्रकारांनी ही नवी वाट चौखाळत पत्रकारिता सुरू ठेवली आहे. मात्र त्यांना यातील आधुनिक तंत्राबद्दल पत्रकारांना अवगत करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कार्यशाळा राज्यभर घेण्याचा परिषदेचा संकल्प आहे. सुरूवात सांगलीपासून झाली आहे. परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर आणि त्यांच्या टीमचं कौतूक परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी करत अभिनंदन केले आहे.
असे छोटे छोटे उपक्रमच मराठी पत्रकार परिषदेची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, वर्धिष्णू करण्यासाठी गरजेचे आहेत. अन्य जिल्हा संघांनी याची नोंद घ्यावी. तसेच सर्व उपक्रमशील जिल्हा शाखांचं अभिनंदन परिषदेचे वतीने करण्यात आले.
ग्रेट
ReplyDelete