जखम हृदयावर आहे, ही तीन वर्षे कायमची लक्षात राहतील!- जितेंद्र आव्हाड

 


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपूर्वी वादात अडकले होते. कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाच्या उद्घाटनाच्यावेळी विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने आव्हाड यांच्यावर केली होती.

याप्रकरणी त्यांच्यावर 354 अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान रविवारी आव्हाड यांनी एक भावनिक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात की, 1997 साली आई सोडून गेली, 2017 साली बाबा सोडून गेले त्यानंतर 2022 मध्ये पोलिसांनी राजकीय दबावापोटी माझ्यावर खोटी विनयभंगाची तक्रार केली. त्यामुळे ही तीन वर्षे माझ्या कायमची लक्षात राहतील. जखम हृदयावर आहे. आता ह्या नंतर मला किती ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, काही संगता येत नाही. सत्य परेशान हो सक्ता हैं, पराजीत नही.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.