Type Here to Get Search Results !

"साठ आमदारांना १४४ कोटी तर १२ खासदारांना १५० कोटी खर्च" रोहित पवारांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची आकडेवारीच सांगितली

 


मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनदरम्यान आमदारांच्या सुरक्षेबाबत माहित देत काही प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राजयोतील सत्ताधारी आमदार आणि खासदारांवर होणाऱ्या खर्चाबाबतची माहिती समोर आणली आहे.

केवळ सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी शेकडो कोटींचा खर्च होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हंटले आहे. मुंडे यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यांचा व्हिडीओ ट्विट करत रोहित पवार यांनी सुरक्षेबाबतच्या आकडेवारी प्रकाश टाकला आहे.

आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात,”राज्यात एकाच गटाच्या ४० आमदारांसह सत्ताधारी पक्षाच्या सुमारे ६० आमदारांच्या Y+ सुरक्षेचा खर्च दरमहा १२ कोटी म्हणजे वर्षाचा १४४ कोटी होतोय, तर १२ खासदारांच्या सुरक्षेचा खर्च दरमहा सुमारे अडीच कोटी असा वर्षाचा एकूण खर्च सुमारे दिडशे कोटी होत असलयाचे म्हंटले आहे.

तर एवढ्या निधीतून अंगणवाडी सेविका, संगणक परिचालक यापैकी एखाद्या घटकाला न्याय देता आला असता किंवा विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती देता आली असली. त्यामुळं गरज असलेल्यांना जरूर सुरक्षा द्या पण अनावश्यक उधळपट्टी टाळून तिजोरीचीही सुरक्षा करा. नाहीतरी 'वाघांना' सुरक्षेची काय गरज आहे?” असा सवाल देखील यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

 

सभागृहात बोलताना धंनजय मुंडे यांनी कायदा सुव्यवस्थेवर भाष्य केले होते. रोहित पवार यांनी तोच 

व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मुंडे सत्ताधाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत. सत्तापक्षातील 

पन्नास ते साठ आमदारांना जर वाय प्लेस दर्जाची सुरक्षा लागत असेल तर राज्यात खरंच कायदा 

सुव्यवस्था व्यवस्थित आहे का ? असा सवाल यावेळी मुंडे यांनी सभागृहात विचारला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies