Type Here to Get Search Results !

लवकरच बदलणार होम लोनचे नियम, तुम्हाला कसा होणार फायदा पाहा PHOTO

 


नवी दिल्ली : तुमच्या स्वप्नातलं घर खरेदी करण्यासाठी तुम्ही लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

होम लोन संदर्भातील काही नियमात बदल होत आहेत.

तुम्हाला आता सारखं बँकेच्या फेऱ्या घालण्याची आवश्यकता नाही. CNBC आवाजने दिलेल्या 

वृत्तानुसार 

लवकरच हे नवीन नियम लागू होणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, होम लोन घेण्याची 

प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन होऊ शकते.

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार आयटी मंत्रालयाने मालमत्ता आणि तारण ठेवण्यासाठी लागणारी 

कागदपत्रे डिजिटल करण्यासाठी हिरवा सिग्नल दिला आहे. सध्या तुम्ही होम लोनसाठी पहिली नोंदणी 

करता. यानंतर तुमच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन केलं जातं.

तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर जर त्यामध्ये काही बदल असतील तर ते सांगितले 

जातील. त्यांनंतर तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करू इच्छीता ती बघायला मिळेल. लोन घेणाऱ्याचा क्रेडिट 

स्कोअर चेक केला जाईल. सगळं तपासल्यानंतर अधिकारी लोनबाबत एक पत्रक जारी केलं जाईल.

यानंतर लोन घेणारा आणि बँक यांच्यात करार होईल. त्याअंतर्गत लोन घेणाऱ्याला त्याच्या प्रॉपर्टीचे मूळ कागदपत्रे बँकेकडे सादर करावी लागतात. लोनच्या करारासाठी मुद्रांक शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.1 ते 0.2 % आकारले जाते.

 

या सर्व प्रकारानंतर एक दिवस बँक कर्जधारकाला फोन करून प्रॉपर्टी विक्रेत्याच्या नावाने चेक जारी करते. यानंतर तुमच्या कर्जाचा ईएमआय सुरू होतो.

घरात बसून स्वप्नातील घरासाठी कर्ज-गृहकर्ज प्रक्रिया लवकरच पूर्णपणे ऑनलाइन होऊ शकते. आयटी 

मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. मालमत्ता आणि तारण कागदपत्रांचे डिजिटायझेशन 

करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. ऑनलाइन पडताळणीद्वारे कंपन्या कर्ज देऊ शकतात.

 ऑनलाइन प्रॉपर्टी खरेदी करणेही शक्य होऊ शकते. राज्यांनी मुद्रांक व नोंदणी कायद्यात बदल केल्यास 

रिअल इस्टेटच्या विक्रीला वेग येईल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies