Type Here to Get Search Results !

Jio युझर्सची बल्ले बल्ले, आला स्वस्त आणि मस्त प्लॅन, मिळतील अशा सुविधा


 मी किमतीमध्ये अधिकाधिक बेनिफिट्स देण्यासाठी जियो ओळखली जाते. या कंपनीकडे अनेक असे प्लॅन्स आहेत. आता या कंपनीने एक असा प्लॅन लॉन्च केला आहे जो डेटा युझर्ससाठी बेस्ट ठरू शकतो. हा प्लॅन इंटरनेटचा वापर अधिक करणाऱ्या युझर्सना फायदेशीर आहे.

या प्लॅनचं नाव आहे फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक, याचा अर्थ फुटबॉल वर्ल्डकपमनंतर हा प्लॅन बंद होणार आहे. या प्लॅनची किंमत आहे २२२ रुपये.

जियोचा २२२ रुपयांचा हा प्रीपेड प्लॅन ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये युझरला ५० जीबी डेटा मिळतो. फिफा वर्ल्डकप पाहणाऱ्यांसाठी हा प्लॅन उत्तम आहे. ५० जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड हा कमी होऊन ६४ kbps होईल.

गेल्या काही दिवसांमध्ये डेटा प्लॅन खूप महागले आहेत. मात्र या प्लॅनमध्ये डेटा खूप कमी किमतीमध्ये मिळत आहे. डेटाची किंमत पाहिल्यास या प्लॅनमध्ये १जीबी डेटा ४.४ रुपये एवढ्या किमतीला मिळत आहे. त्यामुळे डेटा अॅड ऑन प्लॅन व्हाऊचर खरेदी करण्यापेक्षा हा प्लॅन खरेदी करणे उपयुक्त ठरू शकते.

जियोच्या या रिचार्जसाठी युझर रिटेल स्टोअरमध्ये जाऊ शकतात. तसेच जियो मोबाईल अॅपवरूनही रिचार्ज करू शकतात. MyJIO App आणि जियोच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही रिचार्ज करू शकता. तसेच इतर थर्ड पार्टी अॅप्सवरूनही रिचार्ज करू शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies