Type Here to Get Search Results !

IMDbच्या टॉप स्टार्समध्ये साऊथच्या कलाकारांचा बोलबाला, करीना-कतरिना यादीतून गायब

 ०२२ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि या वर्षभरात लोकप्रिय ठरलेल्या टॉप १० सेलिब्रिटींची यादी IMDbने जाहीर केली. या यादीत बॉलिवूडच्या कलाकारांना मागे टाकत साऊथचा सुपरस्टार धनुषने बाजी मारली आहे.

तो या यादीत अग्रस्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी आलिया भट आणि तिसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या राय बच्चनने पटकावला आहे. या यादीत बॉलिवूडच्या बऱ्याच प्रसिद्ध कलाकारांच्या नावाचा समावेश नाही.

IMDb या चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटवरील जगातल्या सर्वांत प्रसिद्ध आणि अधिकृत स्रोताने


2022 च्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा केली आहे. IMDb वर असलेल्या महिन्याला 20 कोटी विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने ही टॉप टेन यादी निर्धारित केली आहे. द ग्रे मॅन आणि तिरूचित्राम्बालाम यासह अनेक भाषांमध्ये यशस्वी कलाकृतींमध्ये भूमिका बजावलेला धनुष या वर्षीच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे.

IMDb चे २०२२चे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलाकार
१. धनुष
२.
३.
४. राम चरण तेजा
५.समंथा रूथ प्रभू
६. हृतिक रोशन
७. कियारा अडवानी
८. एन. टी. रामा राव ज्यु.
९. अल्लु अर्जुन
१०.यश

IMDb सोबत एक्सक्लुझिव्हली बोलतना आलिया भटने ह्या वर्षीच्या यादीमध्ये तिचा समावेश 

झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. २०२२ हे माझ्यासाठी चित्रपटांसंदर्भात आत्तापर्यंतचे सर्वांत संस्मरणीय 

वर्ष ठरले आहे. यावर्षी माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी नेहमी त्यांची ऋणी राहीन 

आणि आपल्या देशातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते व कलाकारांसोबत काम करणे, हा माझा गौरव आहे 

असे मला वाटते. IMDb हे लोकांच्या मनामधील भावना दर्शवणारे खरे माध्यम आहे आणि मला आशा 

आहे की, मी‌ जोपर्यंत कॅमेरासमोर असेन, तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन. प्रेम आणि प्रकाश. 

आपल्याला परत एकदा धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies