Type Here to Get Search Results !

Google Search मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षाही अधिक सर्च झाली सुष्मिता; प्रकरण माहितीये का?

 


मुंबई, 8 डिसेंबर : आपण कुठलीही अडचण आली की पहिलं गुगलला विचारत असतो. प्रत्येक गोष्ट आपण गुगलवर सर्च करत असतो. आपल्या सगळ्या गोष्टींचा डाटा गुगल वर्ष अखेरीस जाहीर करतं.

प्रत्येक वर्षी गुगल आपली सर्च लिस्ट जाहीर करतं. वर्षाच्या शेवटी देशात कोण सर्वात जास्त सर्च झालंय याविषयी यादी जाहीर करतंं. दरवर्षीप्रमाणे गुगलने यंदाच्या वर्षीही ही यादी जाहीर केली आहे. चित्रपट, क्रीडा इव्हेंट्स, व्यक्तिमत्त्वे, बातम्या, आणि पाककृती अशा अनेक श्रेणींमध्ये विषयांची विभागणी केली जाते.

अशातच 2022 मध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आलेली व्यक्तीमत्त्वे कोणती आहेत याची लिस्ट समोर आलीये. या लिस्टमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याकडे एक नजर टाकूया. 2022 वर्षात सर्वात जास्त कोणते व्यक्ती सर्च करण्यात आलं आहे याविषयी पाहूया. या लिस्टमध्ये कोणाचा समावेश आहे आणि कोण कितव्या क्रमांकावर आहे हे पाहूया.

2022 वर्षात सर्वात जास्त सर्च झालेल्या लोकांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेमचा समावेश आहे. पहिल्या क्रमांवर पॉलिटिशय नुपुर शर्मा, दुसऱ्या क्रमांकावर द्रौपती मुर्मू, तिसऱ्या क्रमांकावर ऋषी सुनक, चौथ्या क्रमांकावर ललित मोदी, पाचव्या क्रमांकावर अभिनेत्री सुष्मिता सेन, सहाव्या क्रमांकावर अंजली अरोरा, सातव्या क्रमांकावर अब्दू रोझिक, आठव्या क्रमांकावर एकनाथ शिंदे, नवव्या क्रमांकावर प्रविण तांबे, दहाव्या क्रमांकावर अंबर्ड हर्ड आहे. अशी ही यादी यंदाच्या वर्षीची म्हणजेच वर्ष 2022 ची आहे.

सध्या सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपेक्षाही जास्त सर्च सुष्मिता सेनसाठी करण्यात आलं आहेे.

याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी ललित मोदी आणि सुष्मिताचं रिलेशन. ललित मोदीने सुष्मितासोबत फोटो शेअर करत ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. या बातमीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला. यांच्या नात्याच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

या प्रेम प्रकरणामुळे सुष्मिता आणि ललित मोदी दोघेही चांगलेच ट्रोल झाले. दोघांमध्ये नक्की काय चाललंय जाणून घेण्यासाठी लोकांनी दोघांविषयी मोठ्या प्रमाणावर सर्च केलं. त्यांच्या बऱ्याच जुन्या गोष्टीही आणि जुने फोटोही समोर आले. दरम्यान, सध्या गुगलची ही सर्च यादी चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. गुगल सर्च यादी सोशल मीडियावरही व्हायरल होत असलेली पहायला मिळत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies