शेतात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या आठ वर्षीय मुलीच्या खुनाचा उलगडा, अल्पवयीन आरोपी अटकेत


 भंडारा : जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा इथल्या 8 वर्षीय श्रद्धा सिडाम खून प्रकरणाचा पोलिसांना अखेर सुगावा लागला आहे.

अत्याचाराच्या प्रयत्ना दरम्यान तोंड दाबल्याने श्रद्धाचा गुदमरुन मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तनसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह जाळल्याचं सिद्ध झालं आहे. या प्रकरणी घराशेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला  अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी संशयाच्या आधारावर अटक केलेल्या आरोपीचा या गुन्हात कोणताही समावेश नसल्याचं समोर आलं आहे.

अतिप्रसंगादरम्यान तोंड दाबल्याने श्रद्धाचा गुदमरुन मृत्यू
ही घटना 28 नोव्हेंबर रोजी घडली होती. शिक्षकांची निवडणूक सभा असल्याने शाळा लवकर सुटली होती. त्यामुळे मृत श्रद्धा सिडाम लवकर घरी आली होती. परंतु यावेळी आई घरी नव्हती. आईला शोधण्यासाठी ती घराशेजारी राहणाऱ्या आरोपीच्या घरी गेली. आरोपीच्या घरी कुणीच नव्हते. त्यावेळी त्याने मुलीला घरात नेत डाव साधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. यावेळी आरोपीने श्रद्धाचे तोंड दाबल्याने श्वास गुदमरुन त्यातच श्रद्धाचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने मृत श्रद्धाला पोत्यात भरुन घरामागील खड्ड्यात बुजवले होते. या प्रकाराचा थांगपत्ता लागू नये यासाठी आरोपीने श्रद्धाचा मृतदेह खड्ड्यात बुजवून त्यावर तणसीचा काळीकचरा टाकून थिमेट टाकले.

खड्ड्यात पुरलेला मृतदेह काढून तणसीच्या ढिगाऱ्यात जाळला
श्रद्धा बेपत्ता झाल्याची समजताच 28 नोव्हेंबरच्या संध्याकाळी पोलिसांना तिला शोधण्यास सुरुवात केली. याकरता श्वान पथक देखील पाचारण करण्यात आलं होतं. शोध मोहीमेमध्ये श्वान पथक हे अल्पवयीन आरोपीच्या घरासमोर जाऊन थांबत होते, मात्र तपासा दरम्यान गावात कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. हे सगळं सुरु असताना 30 नोव्हेंबरच्या रात्री आरोपीने संधीसाधून श्रद्धाचे प्रेत पोत्यासह खड्ड्यातून काढून हे घरामागील शेत शिवारात असलेल्या तणसीच्या ढिगारात नेऊन जाळले. या घटनेनंतर तपासातील पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली होती. मात्र त्याच्याकडून गुन्ह्यासंबंधी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी अधिक तपासाचे चक्र फिरवली. अखेर पोलिसांना तपासा दरम्यान 16 वर्षीय अल्पवयीन आरोपी गवसला. श्रद्धाच्या खून प्रकरणी अल्पवयीन मुख्य आरोपीला पकडण्यात यश आले. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरोधात भादंवि कलम 302, 201 आणि पॉस्को कायद्याअंतर्ग गुन्हा दाखल केला आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..