Monday, December 26, 2022

"भाजपचं मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणतंय,'दाल मे कुछ काला है"; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका


 भोर : विधिमंडळाचे हिवाळीअधिवेशन सुरु असून विरोधक राज्य सरकारच्या विरोधात विविध मुद्द्यांवरून आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच विधानसभेत भाजपचेच नेते मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतात.

भाजपचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

भोर तालुक्यात विकास कामांच्या भूमी पूजनासाठी आले असताना सुप्रिया सुळेंनी सरकारवर ही टीका केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी,’भारतीय जनता पक्षचं, मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणत आहे, असा आरोप केला आहे.

तसेच भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांविरोधात विधानसभेत बोलतात, त्यामुळे दाल मे कुछ काला हैअसे म्हणत भाजपच्या भूमिकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच सरकार कर्नाटक सीमा प्रश्नावर मवाळ भूमिका घेत असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment

Featured Post

जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार

 जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार  पुरंदर :        नीरा नजिकच्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील जेऊर रेल्वे अंडर...