Type Here to Get Search Results !

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण करणाऱ्या तिघांना अटक


 बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला तिघा जणांनी पैशासाठी नग्न करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला.

बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

राहुल धोंडीबा उघडे, सुमित किशोर पवार आणि भूषण भास्कर रणसिंग अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला होता. आरोपींनी या तरुणाला बेदम मारहाण करतच त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतले होते. तसेच त्याला एटीएमवर घेऊन जात त्याच्या बँक अकाउंट खात्यातून जबरदस्तीने पैसे काढले होते.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या  दुसऱ्या वर्षाला शिकणारा 21 वर्षाचा विद्यार्थी रविवारी सायंकाळी खरेदी करून दुचाकीने वसतीगृहाकडे निघाला होता. काही अंतर गेल्यानंतर आरोपींनी त्याची दुचाकी अडवली आणि दमदाटी करत त्याच्या खिशातील 15 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत जवळच असणाऱ्या उसाच्या शेतात नेले. त्या ठिकाणी त्याचे कपडे काढून पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि जवळच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन त्याच्या बँक खात्यातून आणखी पैसे काढून घेतले होते. पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपींना अटक केली आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies