मुंबई - 'मावळत्या वर्षाने काय दिले, हा प्रश्न नेहमीचाच आहे. भयाच्या सावटाखाली सगळेच जगत आहेत. लोकशाहीचे काही खरे नाही ही भावना दुःखद आहे. फक्त सत्तेचेच राजकारण चालले आहे. राहुल गांधी भारत जोडण्यासाठी चालत आहेत.
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे
सरकार पाडले हा राजकीय बळजोरीचा प्रकार होता. शिवसेनाही पह्डण्यात आली. सत्तेच्या
गैरवापराचे हे उदाहरण. हे सर्व मावळत्या वर्षात घडले. मावळत्या वर्षात
महाराष्ट्राने एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिले. लोकशाही व भारतीय घटनेचा कोणताही
विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकाकडे ढकलत आहेत. 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात
सुरू आहे व सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र
ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल” असं भाकीत राऊत यांनी वर्तवलं आहे.
“नव्या वर्षात राज्यात व देशात
प्रेरणादायी घडावे अशा अपेक्षेत लोक आहेत. तीन राज्यांतील निवडणूक निकालांनी
भाजपच्या घोडदौडीस लगाम घातला. दिल्लीची महापालिका व हिमाचल राज्य भाजपने गमावले.
त्यामुळे स्वतःच्याच घरात म्हणजे गुजरातमध्ये विजय मिळवला यास महत्त्व नाही. तरीही
देश एका भीतीच्या सावटाखाली आहे. कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे, सरकारी यंत्रणा आपले बोलणे ऐकते आहे असे प्रत्येक प्रमुख
माणसाला वाटते. हे निरोगी लोकशाहीचे लक्षण नाही. नव्या वर्षात तरी देश व जनता
मोकळा श्वास घेईल. आपला देश मनाने जोडला जाईल ही आशा बाळगू या” असा आशावाद देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment