Type Here to Get Search Results !

मसाजरचा शेध घेणाऱ्या पतीला एस्कॉर्ट साइटवर आढळले पत्नी, बहिणीचा फोटो ; मात्र पुढे काय झालं पाहा


 मसाजरचा शेध घेणाऱ्या पतीला एस्कॉर्ट साइटवर आढळले पत्नी, बहिणीचा फोटो ; मात्र पुढे काय झालं पाहा

मुंबई दि.१५


    मुंबई मध्ये ऑनलाईन वेबसाईटवर मसाजर शोधणाऱ्या एका व्यक्तीला चांगलाच धक्का बसला आहे.एस्कॉर्ट साइटवर साईटवर चक्क त्याच्याच पत्नीचा आणि बहिणीचा फोटो आढळून आला आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली 

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना योग्य काळजी न घेणं मुंबईतल्या खारमधल्या एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. ऑनलाइन साइटवर मसाजर शोधताना एका व्यक्तीला आपली पत्नी व बहिणीचे फोटो एस्कॉर्ट साइटवर दिसले.त्या व्यक्तीने याचा स्वत: शोध घेतला, तेव्हा रेश्मा यादव नावाच्या महिलेनं त्यांचे हे फोटो त्या साइटवर टाकल्याचं उघड झाले. पत्नी व बहिणीला सोबत घेऊन त्या व्यक्तीने या प्रकरणाचा छडा लावला अन् आरोपी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तिला पोलिसांनी अटक केली. या आधीही अनेक सुंदर महिलांचे फोटोज सोशल मीडियावरून घेऊन ते एस्कॉर्ट व मसाज साइटवर टाकल्याचं समोर आलं आहे.


त्या व्यक्तीने या प्रकरणाचा तळाशी जाऊन शोध घेण्याचा निर्णय केला आणि एस्कॉर्ट साइटवरच्या त्या फोटोसंदर्भात बहीण व पत्नीला विचारले. त्या वेळी त्यांनी हे फोटो तीन ते चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणाचा छडा लावण्याच्या दृष्टीने पीडित महिलेच्या पतीने एस्कॉर्ट साइटवर देण्यात आलेल्या फोन नंबरवर कॉल केला, तेव्हा समोरून रेश्मा यादव नावाची महिला बोलत असल्याचं सांगण्यात आलं. त्या महिलेने त्या व्यक्तीला खारमधल्या एका हॉटेलवर चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं.


ती व्यक्ती पत्नी आणि बहिणीला सोबत घेऊन हॉटेलवर पोहोचली. रेश्मा तेथे आल्यानंतर तिघांनीही एस्कॉर्ट साइटवर अपलोड केलेल्या फोटोजबद्दल त्या महिलेला जाब विचारला. तेव्हा ती महिला तिघांशीही भांडू लागली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. परंतु या तिघांनीही तिला पकडून पोलीस ठाण्यात नेलं.


या पूर्ण प्रकरणात रेश्मा नावाच्या महिलेने सोशल मीडियावरून त्याच्या पत्नी आणि बहिणीचे फोटो घेऊन एस्कॉर्ट साइटवर टाकल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी रेश्माला अटक केली. तिला न्यायालयासमोर उभे केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असताना नेहमी सतर्कता ठेवायला हवी आणि प्रोफाइल लॉक करून ठेवणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अन्यथा सुंदर महिलांचे फोटो डाउनलोड करून ते अश्लील साइट्सवर टाकले जाऊ शकतात आणि विनाकारण मनस्ताप सहन करावा लागू शकतो. असा काही प्रकार घडत असेल तर याबाबत पोलिसांनाही कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies