आजारपण वाढलं? समंथा सोडतेय देश, चाहत्यांच्या चिंतेत भर

 


दाक्षिणात्य कलाजगत गाजवणारी आणि गेल्या काही काळापासून खासगी आयुष्यासोबतच आजारपणामुळं चर्चेत असणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू  येत्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे.

मायोसायटिस (Myositis) या आजारामुळं समंथा येत्या काही दिवसांत देश सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही अभिनेत्री कायमस्वरुपी देश सोडणार नसून आजारपणाच्या उपचारांसाठी ती या निर्णयावर पोहोचली असल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना दिली आजारपणाची माहिती

समंथानं काही दिवसांपूर्वीच एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या आजारपणाची माहिती दिली होती. आपण मायोसायटिस या आजारानं त्रस्त असून, सध्या त्यावर उपचार सुरु असल्याचं तिनं सांगितलं. हा एक ऑटोइम्यून डिजीज (Autoimmune disease) असून, तो बरा होण्यास अपेक्षेहूनही जास्त वेळ लागू शकतो. सध्या एकूण आजारपण पाहता त्याच उपचारांसाठी सॅम दक्षिण कोरियाला (South korea) जात आहे.

उपचारपद्धतीत बदल...

समंथावर सध्या या आजाराचे उपचार सुरु असले, तरीही तिच्यामध्ये अपेक्षित सुधारणा दिसत नाहीयेत. असंही म्हटलं जात होतं की तिला या आजारावर आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार घ्यायचे होते. ज्यासाठी ती दक्षिण कोरिया गाठत आहे. थोडक्यात पुढील काही महिने समंथा दक्षिण कोरियातच वास्तव्यास असणार आहे. आजारातून सावरल्यानंतर ती 'खुशी' या चित्रपटाच्या सेटवर परतण्याची सकारात्मक आशा बाळगून आहे.

आजारावर वैद्यकिय क्षेत्रात अद्यापही कोणता उपचार नाही?
Myositis
हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर या प्रकारात मोडणारा आजार आहे. ज्यामध्ये इतरही आजारांचा समावेश असतो. असं म्हटलं जातं की या आजारात रुग्णाचं शरीर तिळतिळ तुटतं. यामध्ये आव्हानात्मक बाब म्हणजे या आजारावर अद्यापही वैद्यकिय क्षेत्राला कोणताही उपचार सापडेला नाही.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..