मॉर्निंग वॉक करताना पडल्याने बाळासाहेब थोरात जखमी


 कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सकाळी मॉर्निंग वॉक करताना पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, थोरात यांचा खांदा फ्रॅक्‍चर झाला असून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येत आहे.

माजी मंत्र्यांचे पुण्यातील फॅमिली डॉक्‍टर मुंबईत त्यांच्यावर उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नागपुरातील आमदार वसतिगृहाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. संजीव धवड यांनी सांगितले की, थोरात सकाळी साडे सात ते आठ या वेळेत मॉर्निंग वॉक करताना पाय घसरून पडले होते.त्यावेळी त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्याच्या कपाळावर जखमा होत्या. आम्ही प्राथमिक उपचार करून त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये हलवले,असे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.