Saturday, December 10, 2022

१० महिन्यांच्या मुलीचा कारमधून पडून मृत्यू; आई, मुलगी पडल्या की ढकलले?


 नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कारमधून घरी जात असताना आई व चिमुकली पडल्याने आई गंभीर जखमी झाली तर १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

मात्र या दोघी पडल्या की त्यांना ढकलले हे अद्याप स्पष्ट झाले नसून मांडवी पोलीस तपास करत आहे.

वाडा येथे राहणाऱ्या सोनाक्षी वाकडे (२०) या १० महिन्यांच्या लावण्या या चिमुकलीसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोरमार्गे कारने शनिवारी सकाळी जात होते. विरार फाटा येथील नोव्हेल्टी हॉटेलसमोर दोघीही कारमधून पडल्या. त्याचवेळी पाठीमागून जाणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाहनाने त्यांना पाहिले व दोघींनाही नालासोपारा येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर जखमी आईवर उपचार सुरू आहेत.

आई गंभीर जखमी
नेमके त्या दोघी पडल्या, की त्यांना ढकलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेल्या आईवर उपचार सुरू आहेत. महिला जबाब बदलत असल्याने नेमकी घटना काय घडली ते स्पष्ट होत नाही आहे. याबाबत तपास करत आहे.
-
प्रफुल वाघ, पोलिस निरीक्षक, मांडवी पोलिस ठाणे

 

No comments:

Post a Comment

Featured Post

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान मुंबई :       ...