'बाहेर भेटलास तर कुत्र्यासारखा मारेन'; दृश्यम'च्या गायतोंडेला धमकी, कारण...


 मुंबई - 'दृश्यम'च्या दोन्ही भागांमध्ये पोलिस अधिकारी गायतोंडेने सत्य बाहेर काढण्यासाठी विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केली. त्यामुळे काही प्रेक्षक गायतोंडेवर खूप चिडले असून, त्याचे पडसाद अभिनेता कमलेश सावंतच्या वास्तव जीवनात उमटत आहेत.

एकीकडे कमलेशचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे त्याला धमक्या दिल्या जात असून, शिवीगाळही केली जात आहे. कमलेशच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने 'बाहेर भेटलास तर कुत्र्यासारखा मारेन,' अशी कमेंट केली आहे. एकाने त्याला फोन करून आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. कमलेशने ब्लॉक केल्यानंतरही त्याने चार-पाच वेळा फोन केला. खरे तर हीच कमलेशने केलेल्या कामाची पोचपावती असून, हेच त्याच्या कॅरेक्टरला मिळालेले रसिकांचे प्रेम आहे.

दृश्यम २ सिनेमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद

दृश्यम या चित्रपटाची कथा जेथे संपली होती, तिथून दृश्यम २ या चित्रपटाची कथा सुरू होत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालात 'दृश्यम 2' मास सर्किट्समधून मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. 'दृश्यम २' चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले असून या सिक्वलमध्ये अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर परतला आहे. आपल्या कुटुंबाच्या प्रभावी सुरक्षेसाठी त्यानं लावलेलं डोकं कौतुकास्पद ठरत आहे. या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि रजत कपूर हेही भूमिका साकारत आहेत.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..