भिवंडी : भिवंडीमध्ये एक मोठी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ठाण्यात कामगार पुरवणाऱ्या दोघांमधील वाद विकोपाला जाऊन एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
काय घडले नेमके?
ठाणे येथील लोढामध्ये काम
पुरवण्याच्या कामावरुन गणेश कोकाटे आणि गणेश इंदुलकर यांच्यात वाद होता. या
घटनेच्या अगोदरदेखील गणेश कोकाटे यावर गणेश इंदुलकर याने गोळीबार केला होता. गणेश
कोकाटे त्यातून थोडक्यात बचावला होता. या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत चार जणांना
अटक केली होती.
घटनेच्या
दिवशी संध्याकाळी गणेश कोकाटे ठाणे येथून कशेळी येथील घरी जात असताना त्याच्यावर
हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने गणेश कोकाटे याच्यावर
गोळ्या (shot
dead) झाडल्या आणि तो घटनास्थळावरून
फरार झाला. या गोळीबारामध्ये गणेश कोकाटे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. व्यावसायिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात
आले आहे. गणेश कोकाटेच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी एकूण 3 पथकं तैनात करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मदन बल्लाळ यांनी दिली आहे. लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल
असेदेखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ म्हणाले आहेत.