पत्नीची हत्या केल्याने तुरुंगवास! 3 वर्षांनी जेलबाहेर येऊन बघतो तर ती जिवंतय, असं कसं?

 


 पत्नीच्या हत्याप्रकरणी वर्ष पती जेलमध्ये राहिला. नंतर जामिनावर बाहेर आला. जेलबाहेर आल्यानंतर पत्नी चक्क जिवंत असल्याचं निदर्शनास आल्यानं तो हादरुनच गेला.

 राजस्थान 

             फक्त पतीच नव्हे तर पोलीस आणि इतरही सगळे चक्रावून गेले. ही घटना राजस्थानच्या दौसामध्ये उघडकीस आली आहे. एका महिलेच्या हत्येप्रकरणी सात वर्षांपूर्वी तिच्या पतीला आणि अन्य एकाला शिक्षा झाली. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. पण जेव्हा हा पती जेलबाहेर जामिनावर आला, तेव्हा 3 वर्ष जेलमध्ये घालवलेल्या पतीने आपल्या पत्नीला रंगेहाथ जिवंत पकडलं. सात वर्षांपूर्वी जिच्या हत्येच्या आरोपाखाली 3 वर्ष जेलमध्ये शिक्षा काढावी लागली, तिला जिवंत पाहून पतीला आधी त्याला धक्काच बसला होता. पत्नीच्या हत्येचा हा गुन्हा मथुरा येथे नोंदवण्यात आला होता.

काय घडलं होतं सात वर्षांआधी?

सात वर्षांपूर्वी मथुरा येथील आरती नावाची महिला मेहंदीपूर बालाजी इथं आली होती. तिथं ती छोटंमोठं काम करुन घर चालवायची. त्या दरम्यान, तिची ओळख सोनू सैनी नावाच्या तरुणाशी झाली. नंतर दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. पण लग्नानंतर अजब घटना घडली.

लग्नानंतर आरती अचानक एक दिवस गायब झाली. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्याआधी आरती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. पण ज्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता, ती महिला आरती असल्याची ओळख पोलिसांनी पटवली.

वडिलांची चूक की पोलिसांची?

आरतीच्या वडिलांनी कपड्यांवरुन ही आपली मुलगी असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाळी आरतीचा पती सोनू सैनी याला अटक केली आहे. तसंच त्याच्यासह अन्य दोघांनाही बेड्या ठोकल्या होत्या. 2015 साली हत्येच्या आरोपाखाली सोनूला तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आलं. आपण हत्या केली नसल्यानं सोनू याने पोलिसांना सांगण्याचा प्रयत्नही केला. पण पोलिसांनी काहीच ऐकलं नाही.

त्यानंतर आता 3 वर्षांनी सोनू जेलमधून बाहेर आला. त्याने आरतीला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर त्याला आरतीचा ठावठिकाणा लागलाच. आरती राजस्थानच्या दौसा येथील विशाला गाव येथे सोनूला जिवंत सापडली.

या संपूर्ण प्रकारावरुन उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केलेत. सोनू याने मेहंदीपूर बालाजी येथील पोलीस ठाण्यात जाऊन आरती जिवंत असल्याची माहिती दिली. ती कुठे आहे, याबाबत त्याने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सोनूच्या सांगण्यावरुन पाहणी केली असता त्यात तत्थ आढळलं. अखेर पोलिसांनी आरतीला ताब्यात घेतलं असून आता याप्रकरणी पुढील तपास केला जातो आहे. पण तोपर्यंत सोनूच्या आयुष्यातील 3 वर्षांचा महत्त्वाचा वेळ जेलमध्ये गेल्यानं हळहळही व्यक्त केली जातेय.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..