Type Here to Get Search Results !

वाहनचालकांनो, नियम पाळा ! मुंबई-पुणे महामार्गासह द्रुतगतीवर आजपासून 24 तास तपासणी

 


पुणे -पुणे मुंबई द्रुतगती मार्ग व जुना पुणे-मुंबई महामार्गावर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर आजपासून चोवीस तास कारवाई केली जाणार आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) चोवीस तास कारवाईसाठी 12 पथके तयार करण्यात आली आहेत.

राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पुण्यात काही दिवसांपूर्वी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी मुंबई-पुणे द्रतगती मार्ग व जुना पुणे-मुंबई महामार्गावर अपघात रोखण्यासाठी एक डिसेंबरपासून वाहनांची चोवीस तास तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईसाठी नोडल एजन्सी म्हणून पुणे व पनवेल आरटीओ काम करत आहेत. या उपक्रमासाठी मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमधून 12 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी सहा पथके चोवीस तास रस्त्यांवर तैनात राहणार आहेत. प्रत्येक पथकात तीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तपासणीसाठी महामार्ग पोलीस, आरटीओ आणि आयआरबी यांची देखील मदत घेतली जाणार आहे.

यांच्यावर होणार कारवाई
चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनचालक.
अपघातग्रस्त ठिकाणांचे सर्वेक्षण करणे व त्या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या हेतूने उपाययोजना करणे. वाहनचालकांच्या माहितीकरीता तेथे घडलेल्या अपघातांची माहिती देणारे बोर्ड लावणे
विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट प्रवास करणारे चालक व प्रवासी.
अवैधरीत्या रस्त्यावर पार्किंग करणारे वाहनचालक
अतिवेगाने जाणारी वाहने
उजव्या मार्गिकेत कमी वेगाने चालणारी वाहने उदा. ट्रक, बस, कंटेनर

रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्‍लेषण केले असता 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती व वाहतूक नियमांचे पालन न करणे यामुळे होतात, असे दिसून आले आहे. रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्व चालक व नागरिक यांनी स्वतःहून नियमांचे पालन करावे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies