भारतात दुधाच्या उत्पादनात (Milk Production) मोठी वाढ झाली आहे. मागील आठ वर्षाच्या काळात दुधाच्या उत्पादनात 83 मेट्रिक टन वाढ झाली आहे.
तर जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा आहे. या
वाढत्या उत्पादनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. दुग्ध व्यवसाय हा आपल्या देशातील
महिला शक्तीला आणखी बळकट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आगामी काळात डेअरी क्षेत्र
आणखी पुढे जाईल असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पशुसंवर्धन
मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. केंद्रीय पशुसंवर्धन
मंत्री रुपाला यांनी आपल्या व्टीटमध्ये गेल्या 8 वर्षांत दूध उत्पादनात अभूतपूर्व वाढ
झाली आहे. आठ वर्षात दुध उत्पादनात 83 मेट्रिक टन पर्यंत वाढ झाल्याचे म्हटलं
होते.
उत्तर प्रदेश, राजस्थान क्रमांक एकवर
भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक
करणारे राज्य म्हणून उत्तर प्रदेश आणि राजस्थानकडे पाहिले जाते. उत्तर प्रदेश दूध
उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान दूध उत्पादनात दुसऱ्या
क्रमांकावर आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.
राजस्थाननंतर दूध उत्पादनात मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात चौथ्या
क्रमांकावर तर आंध्र प्रदेश पाचवा क्रमांक आणि पंजाब दूध उत्पादनात सहाव्या
क्रमांकावर असल्याची माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने दिली आहे.
भारत जगातील सर्वात मोठा दूध
उत्पादक देश
भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक
देश म्हटले जाते. भारतात 2018-19 या वर्षात 188 दशलक्ष टन दूध उत्पादन झाले होते, तर 2019-20 मध्ये ते 198 टन दूध उत्पादन झाले
आहे. दुग्धोत्पादनाची जागतिक आकडेवारीनुसार, 2020 मध्ये 880 दशलक्ष टनांहून अधिक दूध उत्पादन झाले
आहे. ज्यामध्ये भारताचा वाटा 184
दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे. हे
संपूर्ण जगाच्या दुधाच्या उत्पादनाच्या 23 टक्के आहे. सध्या अमेरिकेचा जागतिक दूध
उत्पादनात 11 टक्के वाटा आहे, तर 7 टक्के दूध उत्पादनासह पाकिस्तान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.