सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचे (Instagram) एक फीचर खूप लोकप्रिय आहे. TikTok वरून प्रेरित होऊन कंपनीने हे फीचर सादर केले होते. आतापर्यंत तुम्हाला त्याचे नाव समजले असेलच. होय, आम्ही इंस्टाग्राम रीलबद्दल बोलत आहोत.
आता त्याची वाढती लोकप्रियता पाहून टेलिकॉम कंपनी जिओ देखील असा प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, रोलिंग स्टोन्स इंडिया, क्रिएटिव्हलँड एशिया आणि जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड
यांनी मनोरंजनासाठी एक शॉर्ट व्हिडीओ ॲप प्लॅटफॉम लाँच करण्यासाठी भागीदारी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, ॲपचा उद्देश स्टार एंटरटेनर्ससाठी एक इकोसिस्टम तयार करणे आहे. याद्वारे,
कंपनीला ऑर्गेनिक ग्रोथ वाढवायची आहे आणि मॉनेटायझेशन स्थिर ठेवायचे आहे. प्लॅटफॉर्म अॅपवर
निर्माते, गायक, अभिनेते, संगीतकार, डान्सर्स, कॉमेडियन, फॅशन-डिझायनर आणि सांस्कृतिक प्रभावशाली
बनू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी जागा असेल.
कंपनीने म्हटले आहे की हे प्लॅटफॉर्म Jio Platforms Limited च्या तंत्रज्ञान पायाभूत सुविधांद्वारे
समर्थित असेल. यामुळे कंपनीला भारतातील नंबर-1 टेलिकॉम ऑपरेटर बनण्यास मदत झाली. हे Jio
मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल ॲप्स सारख्या प्लॅटफॉर्मच्या इतर ॲप्सना देखील सपोर्ट
देते.
रिपोर्टनुसार, ॲपचे पहिले 100 फाऊंडिंग मेंबर्स इन्व्हाईट ओन्ली आधारावर सामील होऊ शकतात.
त्यांना
त्यांच्या प्रोफाईलवर गोल्डन तिकीट व्हेरिफिकेशन देखील दिले जाईल. हे मूळ मेंबर्सना रेफरल
प्रोग्रामद्वारे नव्या मेंबर्सना साईन अप करून
देऊ शकतील.
हे नवीन मेंबर्स प्लॅटफॉर्मवर ॲड केलेल्या फीचर्सनाचे सर्वात पहिले प्रीव्हू करतील. रिपोर्टनुसार, हे ॲप
पुढील वर्षी जानेवारीपर्यंत लाँच केले जाऊ शकते. हे बीटा चाचणीसाठीही उपलब्ध करून देण्यात आले
आहे.