Type Here to Get Search Results !

"आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा कारण...."; शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा


.दिल्लीतील महरौली येथील फ्लॅटमध्ये 28 वर्षीय आफताब पूनावाला याने 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या केली.

या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबच्या शेजाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे. आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा असं म्हटलं आहे. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब अतिशय हुशार आहे. तो चौकशीत प्रश्नांची उत्तर इंग्रजीत देतो. मात्र त्याला हिंदीही उत्तम बोलता येतं. श्रद्धा राहत असलेल्या घरात असलेला पाण्याचा पंप रात्री उशिरा सुरू व्हायचा, असं त्यांच्या शेजाऱ्यांपैकी काहींनी सांगितलं. याबद्दलची अधिक माहिती पोलिसांनी दिली. आफताब रात्री उशीरा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करायचा. त्यावेळी होणारा आवाज कोणालाही ऐकू येऊ नये यासाठी पाण्याचा पंप सुरू करायचा असं पोलिसांनी सांगितलं.

आफताब जास्त लोकांशी बोलायचा नाही. संध्याकाळी घरी यायचा आणि नेहमीच ऑनलाईन फूड डिलेव्हरी एपच्या माध्यमातून जेवण मागवायचा अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. श्रद्धाचा गळा आवळून खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आफताब जवळच्या बाजारात गेला. तिथून त्याने एक 300 लीटरचा फ्रीज खरेदी केला. त्यासाठी त्याने क्रेडिट कार्डने 23,500 रुपये दिले. तसेच त्याने चाकू आणि कचरा टाकण्यासाठी असलेल्या पिशव्या विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. सीएनएन-न्यूज18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आफताबचा जेलमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आफताब जेलमध्ये असून त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात दरम्यान त्याचा जेलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात आफताबची चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात कोणताच खेद जाणवला नाही. त्याला या गोष्टीचा पश्चाताप देखील नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी अटक केल्यावर आफताब एकदाच रडला. आफताबचे वडील अमीन पुनावाला कोठडीत त्याची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आफताबच्या डोळ्यात अश्रू होते अशी माहिती समोर आली आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies