Type Here to Get Search Results !

मंदी, कपातीच्या दिवसात स्वत:ला असं करा सुरक्षित, या ५ टिप्समुळे तुम्ही राहाल आर्थिकदृष्ट्या सुरक्षित


 हागाई आणि कंपन्यांमध्ये होत असलेल्या कामगार कपातीमुळे जगभरातमध्ये मंदीचे सावट आले आहे. मेटा,

ट्विटर आणि अॅमेझॉनसारख्या दिग्गज कंपन्या कपात करत आहेत. अशा परिस्थितीत कुठल्याही स्थितीसाठी तयार

राहिले पाहिजे. मंदी आणि कामगार कपातीचा सामना करण्यासाठी काही पावले उचलली पाहिजे. आज आम्ही

तुम्हाला ५ अशा टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळासाठी तयार करतील.

सर्वप्रथम तुम्ही तुमचा रिझ्युम भक्कम बनवा, त्यासाठी तुमच्यामधील कौशल्य वाढवा. नवी कौशल्ये आत्मसात

कराल. तुम्हाला तुमच्यामधील स्किल्सचं मार्केटिंग करता आली पाहिजेत. तसेच तुमच्या रिझ्युममध्ये कस्टमर

सर्व्हिस, कम्युनिकेशन, टाइम मॅनेजमेंट यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

उत्पन्नासोबतच गुंतवणूकही आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक उत्पन्नाच्या मार्गांची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला

दिला जातो. उत्पन्न हे अनेक मार्गातून आलं पाहिजे. त्यामुळे एक मार्ग बंद झाला तर दुसऱ्या मार्गाने पैसा येत

राहील. तसेच त्यामधून तुमच्या आवश्यक खर्च सुरूच राहील.

वाईट काळाची कुणकूण लागण्यापूर्वीच तुम्ही तुमचे खर्च मर्यादित करा. तसेच काही काळासाठी बचत वाढवू शकता.

जर तुम्ही आर्थिक अडचणीत सापडलात तर किमान तीन ते सहा महिन्यांचा खर्च चालून जाईल एवढा पैसा

तुमच्याकडे बचतीच्या रूपात असला पाहिजे.

जर तुम्ही दीर्घकाळासाठी काही गुंतवणूक करत असाल तर ती थांबवू नका. अनेकदा लोक गडबडीमध्ये गुंतवणूक

काढून घेतात. हा मार्ग चुकीचा आहे. तुमच्या गुंतवणुकीचं लक्ष्य, टाइम फ्रेम काय आहे आणि तुमच्यामध्ये धोका

पत्करण्याची किती क्षमता आहे, याचा विचार केला पाहिजे.

तुमचं वय कमी असेल तर तुम्हाला गुंतवणुकीमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट स्टॉक्समध्ये ठेवला पाहिजे. ५० ते ६०

च्या वयावरील लोकांनी थोडं आक्रमक राहिलं पाहिजे. बाँड्स कॅशसारख्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies