मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत
यांनी राज्यपालांच्या विधानावरून थेट महाराष्ट्र सरकारवर हल्लबोल केला आहे.
अफजल
खानाच्या कबरी तोडण्याचे नाटक कशासाठी करताय ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमानाचं तुणतुणं वाजवत
शिवसेना फोडली आणि भाजपसोबत गेले. आता कुठं गेला तुमचा स्वाभिमान राज्यपालांना ७२
तास झाले शिवाजी महाराजांचा अपमान करून असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
माध्यमांशी बोलताना यावेळी संजय राऊत सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून
आले. राज्यपाल आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने शिवाजी महाराजांचा अपमान
केल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोक साधा निषेध व्यक्त करू शकलेले नाही
असही राऊत यावेळी म्हणाले.
शिवाजी
महाराजांचा अपमान हा भाजपने केलेला अपमान आहे,मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा
होता या अपमानानंतर असंही संजय राऊत यावेळी म्हणालेत. आम्ही महाविकास आघाडीसोबत
गेलो म्हणून तुम्ही पक्ष सोडला इथे तर भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राज्यपालानं
अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केलाय तरीही तुम्ही सत्तेला चिटकून बसलेला
आहेत. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय अशा बोचऱ्या शब्दात राऊतांनी शिंदे गटाला
सुनावले. तसेच मुख्यमंत्र्यांनी भाजपचा निषेध केला पाहिजे,धिक्कार केला पाहिजे आणि राज्यपालांना हटवण्याची मागणी
महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे यायला पाहिजे नाहीतर जोडे काय असतात ते कसे मारले
जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.
काय म्हणाले होते कोश्यारी नेमकं
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ काल पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी
केलेल्या विधानामुळे नवा वाद सुरु झाला आहे. यावेळी बोलताना कोश्यारी म्हणाले, तुम्हा तरुण मुलांना जर कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण ? तुमचा आवडता नेता कोण? तर
तुम्हाला बाहेर जायची गरज नाही,महाराष्ट्रातच
तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत मी आधुनिक काळाबाबत
बोलत आहे. इथेच मिळतील डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला
सर्व इथेच मिळतील” असं विधान
कोश्यारींनी केलं होत.