Type Here to Get Search Results !

लेकीनं उंचावली बापाची मान! शरद पोंक्षे यांच्या मुलीचे स्वप्न सत्यात उतरले, बनली पायलट

 


२१व्या शतकात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. अगदी आता शेअर मार्केटमध्येही मुली गुंतवणूक करत भरघोस यश प्राप्त करताना दिसत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या शरद पोंक्षे यांच्या मुलीनेही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

शरद पोंक्षे यांची लाडकी मुलगी सिद्धी पोंक्षे हिचे वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. स्वत: शरद पोंक्षे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या मुलीच्या यशप्राप्तीची माहिती दिली आहे.

सिद्धी वैमानिक होण्याचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. त्यावेळी वडील शरद पोंक्षे यांनी सिद्धी परदेशात शिकण्यासाठी जात असताना विमानतळावरचे काही फोटो शेअर करत तिच्यासाठी एक भावूक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी 'पिल्लू निघालं वैमानिक व्हायला' असं लिहिलं होतं. आता तिचं ते स्वप्न पूर्ण झालं आहे.

नुकतीच ती एका प्रायव्हेट विमानाची पायलट झाली. ही आनंदाची बातमी सांगताना शरद पोंक्षे यांची छाती जणू अभिमानाने भरून आली होती. सिद्धीचा एक फोटो आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत शरद पोंक्षे यांनी लिहिलं की, "सिद्धी शरद पोंक्षे आज प्रायव्हेट पायलट झाली. असंख्य अडचणीतून मार्ग काढत ती इथपर्यंत पोहोचली. अभिनंदन सिद्धी."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies