Type Here to Get Search Results !

नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल, प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

  
पुण्यातील नवले रविवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील टँकरच्या धडकेने जवळपास 47 वाहनांचे नुकसान झाले.

या अपघाताची दखल आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून या अपघाताची माहिती घेतली तसेच. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून नवले पूल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरत आहे. या परिसरात सतत होणारे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. राष्ट्रीय महामार्गाने ही यासंदर्भात काही उपाययोजना करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. या परिसरात होणारे अपघात रोखण्यासाठी नवले पूल आणि वडगाव पूल जोडण्यासंदर्भातला प्रस्ताव काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेला देण्यात आला होता. मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा अपघात झाल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या अपघातानंतर तरी प्रशासन नवले पुलावर काही तोडगा काढणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान रविवारी रात्री झालेल्या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. भरधाव वेगात टँकरने जवळपास 47 वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर सर्व गाड्या एकमेकांवर आपटत गेल्या आणि हा भीषण अपघात झाला. रात्री उशिरापर्यंत या अपघातात नेमके किती जखमी झाले याची माहिती समोर आली नव्हती. अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य राबवत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies