निव्वळ प्रसिद्धीसाठी याचिका दाखल करणं चुकीचं; ठाकरे, देशमुख, राऊतांवर आरोप करणाऱ्या सर्व याचिका हायकोर्टानं फेटाळल्या

  


निव्वळ प्रसिध्दीसाठी राजकीय हेतूनं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेसह अन्य काही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं  सोमवारी फेटाळून लावल्या.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल  यांच्यावरील खंडणी वसुलीच्या आरोपांत उद्धव ठाकरे  यांचीही तपासयंत्रणेनं चौकशी करावी, अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील  यांनी याचिकेतून केली होती. ठाकरे  यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत खंडणी उकळल्याचे आरोप करण्यात आले होते. यामध्ये निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेचाही  उल्लेख करण्यात आला होता. हेमंत पाटील यांनी अशाचप्रकारे दाखल केलेल्या तीन याचिकांवर न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.जी.डिगे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे सुनावणी झाली.

हेमंत पाटील यांनी दाखल केलेली दुसरी याचिका कोविड कालावधीत औषधोपचारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारी होती. यामध्ये संजय राऊत  यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत, सुजीत पारकर यांच्यावरही यांत आरोप करण्यात आले होते. मात्र ही याचिका निव्वळ राजकीय हेतूनं प्रेरित आहे, असा ठपका ठेवत कोर्टानं ती याचिका फेटाळली. तसेच यामध्ये कोणतेही ठोस पुरावे, माहिती आणि कागदपत्रं सादर केलेली नाहीत ज्यावरून चौकशी करण्याचे आदेश देता येतील, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले.

तर हेमंत पाटील यांनी दाखल केलेली तिसरी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक (Nawab Malik) यांच्याबाबत केली होती. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमुळे सामाजिक सलोखा बिघडतो असा दावा याचिकेत केला गेला होता. मात्र ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या याचिकेसह या सर्व याचिका निव्वळ सवंग प्रसिद्धीसाठी दाखल केलेल्या आहेत, असं निरीक्षण नोंदवून हायकोर्टानं या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..