Thursday, November 17, 2022

धक्कादायक ! मुलाच्या निधनानंतर वडिलांनी सोडले प्राण

 


सिंहगड रस्ता, दि. 17 -नांदेड सिटी येथील रहिवासी संगणक अभियंते असलेले चिन्मय सातपुते (वय 37) यांचे बुधवारी (दि.16) निधन झाले, त्यांच्या मृत्यूचा आघात त्यांचे वडील दिलीप सातपुते (वय 71) सहन करू शकले नाहीत.

यात त्यांचे आज निधन झाले. कुटुंबातील मुलगा आणि वडील यांच्या निधनामुळे सातपुते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नांदेड सिटी येथे राहणारे सातपुते हे चौकोनी कुटुंब. अभियंते चिन्मय यांची नांदेड परिसरामध्ये बॅडमिंटनपटू आणि उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून ओळख होती. विमाननगर येथील आयटी कंपनीमध्ये ते व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. पत्नी दीप्ती सातपुते या पवार पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका आहेत.

बुधवारी (दि.16) अचानक अल्पशा आजाराने चिन्मय यांचे निधन झाले. त्या धक्‍क्‍याने महावितरणमध्ये अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले त्यांचे वडील वडील दिलीप सातपुते (वय 71) यांचेही आज निधन झाले. दिलीप यांचा स्वभाव शांत, हळवा. आपल्या नातवंडासोबत रिटायर लाइफते आनंदाने व्यतीत करीत होते. चिन्मय हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनाचा त्यांना मोठा धक्का बसला. आज, सकाळी त्यांनी मुलाच्या विरहाने आपला प्राण सोडला.

No comments:

Post a Comment

Featured Post

नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप

  नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले  रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप  नीरा : प्रतिनिधी       ...