जनधन खातं उघडताच मिळणार दीड लाख रुपयांचा फायदा, काय आहे स्कीम


 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत.

नागरिकांची गरज ओळखून त्यांच्यासाठी खास सुविधा या माध्यमातून दिल्या जातात. गरजूंना आर्थिक मदत देखील काही योजनांमधून केली जाते. आज अशीच एक लोकप्रिय योजना म्हणजे जनधन योजनेतून उघडण्यात आलेल्या बँक खात्याबद्दल जाणून घेऊया. तुमचं जर जनधन योजनेंतर्गत बँकेत खातं असेल किंवा घरातील नातेवाईकांचं असेल तर तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत लोकांना बँकेत जनधन खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा सरकारने सुरू केलेल्या सर्वात महत्त्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रमांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत गरीबातील गरीब व्यक्ती आपले बँक खाते उघडू शकतात. ज्यामध्ये अनेक वेगवेगळे आर्थिक फायदे आहेत. कोणाला मिळणार दीड लाख रुपययांपर्यंत लाभ प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात खातेदाराला एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. त्यात अपघात विमाही दिला जातो. खातेदाराला एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचा सर्वसाधारण विमा दिला जातो. खातेदाराला अपघात झाला तर ३० हजार रुपये दिले जातात. या अपघातात खातेदाराचा मृत्यू झाला तर एक लाख रुपये म्हणजे एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा लाभ मिळतो. जनधन योजना काय आहेप्रधानमंत्री जनधन योजना ही महत्त्वाकांक्षी आर्थिक योजना आहे जी बँकिंग / बचत आणि ठेवी खाती, पैसे पाठविण्याची, कर्ज, विमा, निवृत्तीवेतन अशा अनेक सुविधा एका बँक खात्याद्वारे ग्राहकाला देते. हे खाते कोणत्याही बँक शाखेत किंवा बिझनेस रिप्रेझेंटेटिव्ह (बँक मित्र) आउटलेटमध्ये उघडता येतं. एवढच नाही तर हे खातं उघडल्यानंतर तुम्हाला कोणतेही पैसे खात्यावर ठेवावे लागत नाही. शून्य रकमेसह हे खातं उघडता येतं.

कसं उघडायचं खातंपंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत सरकारी बँकांमध्ये खाती अधिक उघडली जातात. जनधन खातं खासगी बँकेतही उघडू शकता. जर तुमचं इतर कोणतंही बचत खातं असेल तर तुम्ही ते जनधन खात्यातही कनव्हर्ट करू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, तो जनधन खाते उघडू शकतो. हे खातं उघडण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतातजनधन खाते उघडण्यासाठी केवायसी अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे. या कागदपत्रांचा वापर करून जनधन खाते उघडता येते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड.

कोणते फायदे मिळतातखात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्यात कोणतीही अडचण येत नाही. व्याजाची रक्कम बचत खात्यात मिळत राहील. मोबाईल बँकिंग सुविधाही मोफत असेल. प्रत्येक युजरला २ लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण. १० हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा. रोख पैसे काढणे आणि खरेदीसाठी रुपे कार्ड उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?