Type Here to Get Search Results !

दौंड पोलीस ठाण्यावरील मोर्चात आ. राणे सहभागी; आरोपींच्या अटकेसाठी ४८ तासांचा अल्टिमेट


 दौंडमध्ये हिंदू भगिनींच्या झालेल्या छेडछाडीच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलनामध्ये गुरुवारी (दि.१७) आमदार नितेश राणे सामील झाले होते.

त्यांनी दौंड पोलीस स्टेशनवर काढलेल्या धडक मोर्चातही सहभाग घेतला.

दौंड : दौंडमध्ये हिंदू भगिनींच्या झालेल्या छेडछाडीच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलनामध्ये गुरुवारी (दि.१७) आमदार नितेश राणे सामील झाले होते. त्यांनी दौंड पोलीस स्टेशनवर काढलेल्या धडक मोर्चातही सहभाग घेतला. दरम्यान, गुन्हेगारांच्या गैरवर्तनांना आळा घालण्याचे आवाहन त्यांनी पोलीस प्रशासनाला केले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करून हिंदू भगिनींकडे आणि भावांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याचे डोळे नीट ठेवणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राणे यांनी दिला.

दौंडमधील घोलप आणि जमदाडे कुटुंब मारहाण प्रकरणी आरोपी बादशहा शेखसह अन्य आरोपींना ४८ तासात अटक करण्याचा अल्टिमेट आमदार नितेश राणे यांनी दौंड पोलिसांना दिला आहे. आरोपींना अटक झाली नाही तर ४८ तासानंतर दुसरा एपिसोड सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. यापुढे दौंडमधील प्रत्येक घटनेवर राणे लक्ष ठेवून असतील. आगामी काळात विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाईल. यापुढेही हिंदू भगिनींच्या पुढे नितेश राणे हजर असेल, असेही आमदार राणे यांनी सांगितले. यावेळी हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies