ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नही.
होय, चर्चा खरी मानाल तर रतन टाटा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा या रतन
टाटा यांच्या बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटासाठीचा संपूर्ण रिसर्च
पूर्ण झाला आहे आणि 2023 च्या
अखेरिस या सिनेमाचं शूटींग सुरू होईल, अशी आशा
आहे.
रिपोर्टनुसार, या चित्रपटात रतन टाटा यांच्या आयुष्यातील जगाला अद्यापही
माहित नसलेल्या काही खास घटना, काही खास
प्र्रसंग दाखवण्यात येतील. रिपोर्टनुसार, मेकर्सने
स्क्रिप्टवर काम सुरू केलं आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस फोटोग्राफीचं काम सुरू
होईल.
रतन
टाटांनी 1962 मध्ये टाटा ग्रुपमधून करिअर सुरू केलं.
तेव्हा त्यांचं वय फक्त 24 होतं.
पहिल्यांदा त्यांनी टाटा स्टीलच्या एका दुकानात कर्मचारी म्हणून काम केलं. जेआरडी
टाटांनंतर 1991
मध्ये रतन टाटा समूहाचे पाचवे
अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकीर्दित टाटा ग्रुपने टेटली, जग्वार लँड रोव्हर आणि कोरससारख्या कंपन्या विकत घेतल्या. रतन
टाटा यांनी 21
वर्षांच्या करिअरमध्ये टाटा
उद्योग समूहाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या
उल्लेखनीय कार्याची दखल घेतल भारत सरकारने 2000 मध्ये
त्यांना पद्भूषण आणि 2008 मध्ये
पद्मविभूषण पुरस्कार देऊन
गौरवलं.