नाशिक : नाशिकच्या अंबड हद्दीतील चुंचाळे शिवारात स्री जातीचे अर्भक फेकून दिल्याची बाब समोर आली होती. यामध्ये संतापजनकआणि तितकीच धक्कादायक घटना पोलीसांच्या तपासात समोर आली आहे.
अर्भक
फेकून दिल्याची माहिती मंगळवारी समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, पंचनामा करत असतांना पोलिसही हळहळ व्यक्त करत होते.
जन्मदात्यांनाच
ती नकोशी झाल्याची बाब सीसीटीव्हीमुळे उजेडात आल्याने क्रूर आई-वडिलांवर संताप
व्यक्त केला जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी होऊ लागली आहे.
सोमवारी
मध्यरात्रीच्या दरम्यान ‘ती’ चा जन्म झाला होता, अवघ्या
काही तासांची ती होती. आई-वडिलांनी मुलगी झाली म्हणून पिशवीत कोंबून रस्त्याच्या
कडेला कचऱ्यासारखे फेकून दिले होते.
कडाक्याच्या
थंडीत बाळ रडत होते, परिसरात
असलेल्या कुत्र्यांनी त्याच्या हाताला आणि पायाला चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात
रक्तस्राव झाला होता. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला होता.
ही
संतापजनक घटना घडल्यानंतर पोलीसांच्या तपासात आई-वडील दोघेही बाळाला फेकण्यासाठी
जात असतांनाचा सीसीटीव्ही समोर आल्याने कारवाईची मागणी होत असून बाळाच्या अवस्था
ऐकून नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.