Thursday, November 17, 2022

लॉजमध्ये जात जोडप्याचं धक्कादायक कृत्य; बुलडाण्यातील घटनेनं खळबळ

 


बुलडाणा 17 नोव्हेंबर : बुलडाण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात जिल्ह्यातील खामगाव येथील आदर्श लॉजमध्ये एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

दोघांनी एकाच दोराला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघंही खामगावमधील आदर्श लॉजवर थांबले होते.

याच ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतल तायडे असं युवतीचं नाव असून विकास सावळे असं युवकाचं नाव आहे. या घटनेतील युवती ही अगोदरच विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. दिल्लीमध्ये श्रद्धा हत्याकांड - एकीकडे या जोडप्याने एकाच दोराला गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. तर दुसरीकडे सध्या संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची घटना चांगलीच चर्चेत आहे. यात फूड ब्लॉगर आफताब पूनावालाने मे महिन्यात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली.

त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून विल्हेवाट लावली. आता या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. आफताबने श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा दावा केला होता, त्याच जंगलातून आतापर्यंत पोलिसांना 10-13 हाडे सापडली आहेत. मात्र तिचं डोकं, कवटी अद्याप सापडलेली नाही. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिचं बँक अकाउंट अॅप ऑपरेट केले आणि 54,000 रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. आफताबने मोठ्या प्रमाणात पाणी वापरल्याचं त्याच्या फ्लॅटच्या 300 रुपयांच्या प्रलंबित पाण्याच्या बिलावरून सिद्ध झालं.

No comments:

Post a Comment

Featured Post

जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार

 जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार  पुरंदर :        नीरा नजिकच्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील जेऊर रेल्वे अंडर...