Tuesday, November 29, 2022

पुणे स्टेशन बस सेवा आजपासून पुन्हा सुरू


 पुणे -पुणे रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी पीएमपीची बससेवा उद्या (बुधवार) पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील लेन क्रमांक 4 येथून ही सेवा देण्यात येईल.

करोना काळापासून पीएमपीची येथील सेवा बंद होती. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा तसेच खासगी प्रवासी वाहनांचा वापर करावा लागत होता. त्यांच्याकडून अनेकदा या प्रवाशांकडून जादा भाडे वसूल केले जात होते. तथापि, पीएमपीची सेवा पुन्हा सुरू होत असल्याने या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 8 मार्गांवर ही बससेवा असेल, असे प्रशासानाकडून सांगण्यात आले.

या मार्गांवर धावणार बस
पुणे स्टेशन ते वडगाव-वेणूताई कॉलेज
पुणे स्टेशन ते एनडीए गेट नं. 10
पुणे स्टेशन ते अप्पर डेपो
पुणे स्टेशन ते हिंजवडी (बीआरटी)
मनपा भवन ते डी. वाय. पाटील कॉलेज (बीआरटी)
पुणे स्टेशन ते खराडी, ढोले पाटील कॉलेज
पुणे स्टेशन ते चिंचवडगाव (बीआरटी)
मनपा भवन ते डायमंड वॉटर पार्क दादाची पडळ

No comments:

Post a Comment

Featured Post

जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार

 जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार  पुरंदर :        नीरा नजिकच्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील जेऊर रेल्वे अंडर...