Wednesday, November 16, 2022

प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारणार




प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबर परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर राज्य सरकारकडून आणखी एक पाऊल टाकण्यात येत आहे. प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारून त्या भागात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा लाइट व साऊंड शो सुरू करण्यात येणार आहे.

याविषयीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी पर्यटन सचिवांना दिले.
प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमी संघटनांकडून करण्यात येत होती. साताऱ्याच्या हिंदू एकता आंदोलन संघटनेकडूनही याबाबतचे पत्र पर्यटनमंत्र्यांना देण्यात आले हाेते. याची दखल घेत लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक) उभारण्यासाठीचे आदेश पर्यटन सचिवांना दिले.

३५० वर्षे पूर्ण शिवरायांच्या राज्याभिषेकाला होत असून, त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हे शिवप्रताप स्मारक आणि लाइट व साऊंड शो उभारण्याचे आदेश पर्यटनमंत्र्यांकडून देण्यात आले.


No comments:

Post a Comment

Featured Post

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद

  वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद, १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त बारामती | प्रतिनिधी बारामती तालुक्या...