गुजरात निवडणूक ! ३० वर्षांतील सर्वांत मोठी मंदी; अस्वस्थ व्यापार अन् उद्योग...


 सुरत : गेल्या तीस वर्षांतील सर्वांत मोठी मंदी. मालाला उठाव नाही. त्यात जीएसटीचा जाच, त्यामुळे सुरत टेक्सटाइल मार्केट अर्थात सिल्क सिटीमधील व्यापारी व उद्योजक यांची अस्वस्थ घालमेल सुरू आहे.

त्यांच्या मनात नेमके काय चाललेय, हे उघड न करता ही मंडळी शेवटी येणार तर मोदीच हे एकदाच सांगून आपला पिच्छा सोडवून घेतात.

जीएसटी लागू होण्यापूर्वी सुरतमध्ये सहा लाखांहून अधिक हातमाग होते. जीएसटीनंतर त्यातील लाख ते दीड लाख बंद झाले. शहरातील व्यापाऱ्यांची संख्या आता ५० हजारांपर्यंत खाली आली असून, त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिकांनी त्यांना व्यापारात तोटा झाल्याचे म्हटले आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ सुरत टेक्सटाईल ट्रेंड असोसिएशनने दिली आहे. येथील कापड निर्मितीही प्रचंड घटली आहे.

मोदी हवेतच
n
रेशम मार्केटमधील फ्लोरा साडीचे हितेश मेहता सांगतात की, आता साडी खरेदीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्याला जीएसटी जेवढे कारणीभूत आहे तेवढेच अतिउत्पादनसुद्धा कारणीभूत आहे.

nमेहता म्हणाले, नियतीपेक्षा जास्त कुणाला काही मिळत नाही. धंदा आज नाहीतर उद्या होईल. पण, सुरक्षेसाठी मोदी हवेतच. स्थानिक उमेदवार कोण, याचे मला काही घेणे-देणे नाही. रिंग रोडवरील जेएस मार्केटमधील सुमित राजपुरोहित म्हणाले, जीएसटीचा फटका मोठा आहे. परंतु, उघड कोण बोलणार?

जीएसटीने माती केली
शहरात १५ लाखांहून अधिक स्थलांतरीत कामगार असून, त्यातील पाच लाखांहून अधिकांना विणकर युनिटमध्ये काम मिळते, तर चार लाखांहून अधिक कामगार प्रक्रिया उद्योगात आहेत. हा उद्योग जीएसटीने काळवंडला आहे.
जीएसटीचा मतदानावर काही परिणाम होणार का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'लोकमत'ने केला. २०१७च्या निवडणुकीपूर्वी त्याचे परिणाम तेव्हा फारसे उमटले नव्हते, आता मात्र जीएसटीचे परिणाम स्पष्ट दिसत असून, गेल्या ३० वर्षांत नव्हती अशी मंदी बाजारात दिसते आहे, असे व्यापारी सांगतात.

पूर्वी ६० हजार मिळायचे आता ३० हजार मिळतात...
उत्तर प्रदेशातील गोरखपूरहून कामासाठी आलेला किसलय म्हणाला की, पूर्वी मी पन्नास ते साठ हजार रुपये महिना कमवायचो. आता ग्राहकी घटली व मासिक आयसुद्धा तीस हजारांपर्यंत खाली आली. या महागाईमध्ये कसे जगावे? पण गावाकडे काम नाही. त्यामुळे येथे थांबण्याशिवाय पर्याय नाही.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..