बारामती, 13 नोव्हेंबर : शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराला अजित पवार गैरहजर असल्यामुळे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण, मी 4 आणि 5 तारखेला रात्री उशिरा बारामतीतून बाहेरगावी गेलो होतो. परदेशात आणि 10 तारखेला रात्री उशिरा परत आलो, असं म्हणत अजित पवार यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले अजित पवार आज बारामतीमध्ये विकास कामाच्या दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी मीडियाशी बोलत असताना अजित पवार यांनी नाराजीबद्दल भाष्य केलं. ' मी चार आणि पाच तारखेला रात्री उशिरा इकडून बाहेरगावी गेलो होतो.
परदेशात आणि 10 तारखेला रात्री उशिरा परत आलो अकराला मी दिवसभर आपल्या मावळमध्ये होतो. 12 तारखेला मी माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यात होतो. शिरूर लोकं मला भेटली आणि आज मी बारामतीमध्ये आहे. मी त्यावेळेस मला काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोललो, नाराजी वगैरे काहीही नाही, असं अजित पवार म्हणाले.
(शिंदे गटाला धक्का, गजानन कीर्तिकरांचा मुलगा उद्धव ठाकरेंसोबतच!)'त्या संदर्भामध्ये पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेब जाणार होते अशी सुरुवातीला बातमी आलेली होती. परंतु तब्येतीच्या कारणास्तव साहेब गेले नाही. परंतु आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे खासदार आणि जितेंद्र आव्हाड हे तिघे आणि इतर काही कार्यकर्ते सहभागी झाले होते. आदित्य ठाकरे देखील शिवसेनेचे नेते त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि काँग्रेसचे तर सगळे सहभागी आहे, अशी प्रतिक्रियाही अजितदादांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर दिली.
'प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना किंवा पक्षाच्या नेतेमंडळींना अशा प्रकारच्या यात्रा काढण्याचा अधिकार आहे. याच्या आधी अनेकांनी भारताच्या आता आपले पूर्वीचे पंतप्रधान चंद्रशेखर साहेबांनी पण पदयात्रा काढलेली होती. त्याच्या आधी अडवाणी साहेबांनी पण रथयात्रा काढलेली होती. आता राहुल गांधीजींनी पदयात्रा काढलेली आहे, कन्याकुमारीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत काढली आहे, असंही अजित पवार म्हणाले.
(मोठी बातमी! ठाकरे गटाची मुलखमैदान तोफ सुषमा अंधारेंचे पती करणार शिंदे गटात प्रवेश)'ते त्यांच्या परीने त्यांना जे काही योग्य वाटतं त्यांना आता काम करत असताना ज्या गोष्टी जाणवतात त्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय आणि त्यांच्या पक्षाबद्दल एक वातावरण कसं निर्मिती करता येईल या पद्धतीचा प्रयत्न त्यांचा आहे तर हा प्रयत्न चालू करत
असताना प्रत्येक पक्ष आपापल्या
परीने राज्यांमध्ये देशांमध्ये अशा प्रकारचं काम करत असतो. मी त्या संदर्भामध्ये
मध्यंतरी मी सांगितलेलं होतं. त्याबद्दलची मीटिंग उद्याच्या मंगळवारी मुंबईमध्ये
घेणार आहे, असंही अजितदादा म्हणाले.
आव्हाड यांना अटक झाली.
त्याबद्दल मला आता काही तुम्हाला सांगायचं नाही मी त्याच्या संदर्भामध्ये मंगळवारी
माझी माझी प्रेस घेणारे आहे. त्यावेळेस सांगेन. कारण लोकं काही गप्प डोळे झाकून
बसत नसतात.
लोक सगळं काही चाललेल आहे ते
पाहत असतात आणि लोकांना महाराष्ट्रातली जनता समजून घेते, कसं चाललंय काय चाललंय कोण काय
करतंय, कुणाच्या चुका आहेत. कुणाच्या बरोबर आहेत कोण चुकीचे स्टेटमेंट
काढतंय. महाराष्ट्रामध्ये कधी वडिलधाऱ्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करायला शिकवलेलं
नसताना देखील काही राजकीय पक्षाचे नेते हे जाणीवपूर्वक काही ना काही वक्तव्य त्या
ठिकाणी करत आहे आणि त्याच्यातून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न होतोय ही आपली
महाराष्ट्राची संस्कृती नाही ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाही. अशा प्रकारच्या
गोष्टी महाराष्ट्रामध्ये अजिबात करता कामा नये, असंही अजित पवार म्हणाले.