Sunday, November 13, 2022

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन.


 तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिचा कोल्हापुर येथे अपघाती मृत्यु झाला आहे.

कोल्हापुर सांगली महामार्गावरील हालोंडजवळ डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणीचा मृत्यु झाला. या दुर्घटनेनंतर कलाक्षेत्रातील तिच्या अनेक सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

कल्याणी हिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली होती. कल्याणी मुळची कोल्हापुरचीच होती. प्रेमाची भाकरी नावाने तिने स्वत:चे हॉटेल देखील सुरु केले होते.

No comments:

Post a Comment

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...