औरंगाबाद 21 नोव्हेंबर : कन्नडला रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा होता.
या दौऱ्यादरम्यान माजी आमदार
हर्षवर्धन जाधव हे रेल्वेमंत्री दानवे यांना औरंगाबाद ते चाळीसगाव रेल्वे व्हावी, असं निवेदन देणार होते.
परंतु, रावसाहेब दानवे यांनी त्यांचं
निवेदन घेण्यास नकार दिला आहे. यामुळे भाजप नेते रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई
हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष याआधीही अनेकदा
पाहायला मिळाला आहे.
अनेकदा हर्षवर्धन जाधव यांनी
दानवे यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा माजी आमदार
हर्षवर्धन जाधव यांचे निवेदन घेण्यास केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी
नकार दिला. हर्षवर्धन जाधव यांनी देवगाव पोलीस स्टेशन येथे लेखी विनंती केली. यावर
पोलिसांनी त्यांना सांगितलं तुम्ही निवेदन देऊ नका.
कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का
पोहोचेल, असं कारण देत पोलिसांनीही त्यांना निवेदन न देण्यास सांगितलं. देवगाव
पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना याबाबत
सांगण्यात आलं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब पाटील दानवे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी रविवारी देवगाव रंगारी
आणि कन्नड दौऱ्यावर आले होते. याच कारणामुळे औरंगाबाद, कन्नड, चाळीसगाव, धुळे या रेल्वेमार्गासाठी माजी
आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमातून दानवेंना भेटून निवेदन देण्याची इच्छा
व्यक्त केली होती. शनिवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ही इच्छा व्यक्त
केली होती. मात्र, ही भेट पोलिसांनीच नाकारली.