Type Here to Get Search Results !

बादशाह माणूस! विक्रम गोखलेंचा गोदावरी ठरला अखेरचा चित्रपट, जितेंद्र जोशी म्हणतो...

 


मराठी रंगभुमी, सिनेसृष्टी, हिंदी सिनेसृष्टीला लाभलेले उत्कृष्ट अभिनेते विक्रम गोखले आज आपल्यात नाहीत.

काल पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत होते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ते भुमिका साकारत होते. तर 'गोदावरी' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांची भुमिका होती. गोदावरी सिनेमाचा निर्माता आणि अभिनेता जितेंद्र जोशीविक्रम गोखलेंच्या आठवणीत भावुक झाला आहे. जितेंद्रने गोदावरी सिनेमामुळे विक्रम काकांबरोबर वेळ घालवला मात्र कोणाला माहित होते की हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरेल.

विक्रम गोखलेंच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. जितेंद्र म्हणतो, 'बादशहा माणूस!!
त्याला अव्याहत काम करायला खूप जास्त आवडायचं. खूश असायचा कॅमेरा सुरू झाला की, रंगमंचावर उभा राहिला की राजा व्हायचा . भेटला रे भेटला की कवेत घ्यायचा, प्रेमाने मुके घेत भरभरून प्रेम केलं आम्हा सर्व मुलांवर.जे जे त्याला येत होतं ते सगळं शिकवण्याचा प्रयत्न केला .देत राहिला सगळी बुद्धी आणि जेजे स्वतः शिकला ते ते सगळं!!
शेवटपर्यंत रुबाबदार राहिला आणि काम करत राहिला.
विक्रम काका..
तू कायम राहणार आहेस तुझ्या कामातून आणि आमच्याही!!

विक्रम गोखले हे केवळ उत्तम अभिनेते नाही तर समाजकार्यातही अग्रेसर होते. भारतीय सैनिकांसाठी तर त्यांनी कायम आर्थिक साहाय्य करायचे.आदिवासी मुलांचे संगोपन, दिव्यांगांचे पुनर्वसन हे देखील त्यांनी ट्र्स्टच्या माध्यमातुन केले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies