Tuesday, November 22, 2022

धक्कादायक! दुसऱ्यांदा लव्ह मॅरेज करण्यासाठी पहिल्या पत्नीची 'अशी' केली हत्या

 


पुणे : वसईतील श्रद्धा हत्याकांड प्रकरण समोर आल्यानंतर लिव्ह इन रिलेशन संकल्पनेवर अनेकांनी सवाल उपस्थित केले.

त्यानंतर आता पुण्यात प्रेमविवाह केल्यानंतर एक पतीने आपल्याच पत्नीचा जीव घेतल्याची घटना समोर आलीय. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या हत्येचं कारणही चकीत करायला लावणारं आहे. दुसऱ्यांदा प्रेमविवाह करण्यासाठी आरोपीने पहिल्या पत्नीची हत्या करण्याचा घाट घातला होता, असा आरोप करण्यात आला आहे.

स्वप्निल सावंत हा एका हॉस्पिटलमध्ये काम करतो. परिचारक म्हणून कामाला असलेल्या स्वप्निलवर आपल्याच बायकोची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. खरंतर स्वप्निल हाच आपल्या बायकोला बरं वाटत नसल्यानं रुग्णालयात घेऊन गेला होता. पण रुग्णालयात त्याच्या बायकोला मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

आता आपण केलेलं कृत्य कुणाच्या लक्षात येणार नाही, असं स्वप्निल सावंत याला वाटलं होतं. पण मृत्यू झालेल्या स्वप्निलच्या बायकोच्या नातेवाईकांना संशय आला. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवात सत्य समोर आलं.

स्वप्निल सावंत याने दुसऱ्यांदा प्रेमविवाह करण्यासाठी पहिल्या बायकोची हत्या करण्याचा कट रचला होता. प्रेमविवाह करण्यासाठी त्याने आपल्या पहिल्या पत्नीला गुंगीचं औषधं दिलं आणि तिची हत्या केली, असं तपासात समोर आलंय.

खरंतर स्वप्निल सावंत याचा पहिलादेखील प्रमेविवाहच झाला होता. पण त्यानंतर तो दुसऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडल्या. या मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पहिल्या बायकोचा काटा काढण्यासाठी हत्येचा कट रचला होता, असं उघडकीस आलंय. या घटनेनं पुण्यात खळबळ माजलीय.

No comments:

Post a Comment

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...