बारामतीत २५ वर्षानंतर पुन्हा सुरू झाले कापसाचे लिलाव

 बारामतीत २५ वर्षानंतर पुन्हा सुरू झाले कापसाचे लिलाव




 बारामती: बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड येथे बुधवारी( दि २) उघड लिलाव पद्धतीने कापुस खरेदी विक्रीचा शुभारंभ बारामती मर्चन्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रशासक मिलिंद टांकसाळे यांच्या हस्ते संपन्न झाला.


उद्घाटनपर भाषणात जवाहरशेठ वाघोलीकर म्हणाले,  बारामती बाजार समितीची ओळख यापुर्वीची कॉटन मार्केट म्हणुन असून सन १९७७ पुर्वी त्यावेळी आवारात एक ते दिड लाख क्विंटल आवक होत होती. ३५ वर्षानंतर परत कापसाचे लिलाव होत असल्याने याचा आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात बारामती बाजार आवारात कापसाची मोठी आवक होईल व कॉटन मार्केट म्हणुन बारामती बाजारपेठ विकसित होईल. पुर्वीप्रमाणे तालुक्यातील इतर संस्थांनी जिनिंग उभारून सहभाग घ्यावा. त्यामुळे कापसाला चागले दिवस येतील. बाजार समितीने आवक व लागवड वाढी बाबत शेतक-यांना प्रोत्साहन द्यावे व कापुस पिकावर परिसंवाद घेऊन शेतक-यांना उत्पादन वाढी बाबत माहिती द्यावी. तसेच व्यापा-यांना सुविधा देऊन कापसासाठी शेड उभारावे, असे आवाहन वाघोलीकर यांनी यावेळी केले.

दरम्यान पहिल्या दिवशी कापसाची ३० क्विंटलची आवक होऊन रू. ८९०१ रुपये एवढा प्रति क्विंटल उच्चांकी दर मिळाला असुन सरासरी रू. ७५०० रुपये प्रति क्विंटल दर निघाला. कल्पेश सोनवणे यांचे आडतीवर राजेंद्र जानु मदने, शिरवली या शेतक-यास रू. ८९०१ रुपये उच्चांकी दर मिळाला. यावेळी बाळासाहेब फराटे, शिवाजी फाळके, उमेश सोनवणे, केशवराव मचाले यांचे आडतीवर कापसाची आवक झाली. तसेच खरेदीदार म्हणुन अमोल वाडीकर, संभाजी किर्वे, निलेश भिंगे, बाळासो फराटे यांनी सहभाग घेतला. यापुढे कापसाचे लिलाव दर बुधवार व शनिवार या दिवशी सकाळी ११ वाजता सुरू होतील. शेतक-यांनी आपला कापुस स्वच्छ व निवडुन आणावा. त्यामुळे आणखी चांगला दर मिळेल. कापुस हे नगदी पिक असुन हमखास उत्पन्न देणारे आहे. आज बारामती व फलटण या तालुक्यातुन कापसाची आवक झाली अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. कार्यक्रमा वेळी शेतकरी, खरेदीदार, आडते व इतर मान्यवरांचे स्वागत प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी केले.


यावेळी बारामती बाजार समितीचे माजी सदस्य रमेशराव गोफणे, अनिल खलाटे, सुनिल पवार, दत्तात्रय सणस, राजेंद्र बोरकर, ज्ञानदेव कदम, सुर्यकांत गादिया, शरद भिंगे व बाजार समितीचे माजी सचिव शिर्के साहेब, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर, मिलिंद सालपे तसेच इतर व्यक्ती व समितीचे सेवक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आभार बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?