अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा;

 अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला काटा; 



वडगाव निंबाळकर येथील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

बारामती दि २

      अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.


वडगाव निंबाळकर येथील ही व्यक्ति फेब्रुवारी २०२२ मध्ये बेपत्ता झाली होती. तो बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांकडून पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या पुरुषाचा मृतदेह लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळाला होता. त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरु करण्यात आला होता.


पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित महिलेच्या प्रियकरासह अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रियकराने तिच्या पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या या खून प्रकरणामुळे वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..