सेक्सटॉरशसन गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात गेलेल्या पुणे पोलिसांवर दगडफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र पोलिसांनी जीवावर उदार होऊन पाठलाग करत आरोपीला पकडले.
याप्रकरणी
अधिक माहिती अशी की, सेक्सटॉर्शनमुळे
पुण्यातील धनकवडी परिसरात एका 19 वर्षे
तरुणाने आत्महत्या केली होती. अर्ध नग्न अवस्थेतील फोटो काढून त्याला ब्लॅकमेल
केले जात होते. याला कंटाळून त्याने दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली
होती. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास
सुरू असताना पोलिसांना येथील आरोपी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली
होती.
आरोपीला
पकडण्यासाठी दत्तवाडी पोलिसांचे एक पथक राजस्थानला गेलेही होते. आरोपी अन्वर खान
याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस जात असताना त्याच्या नातेवाईकांनी व गावातील
लोकांनी विरोध केला. पोलिसांवर दगडफेक करत त्याला पळून जाण्यास मदत केली. मात्र
तरीही पोलिसांनी पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक
चौकशीत राजस्थानच्या त्या गावातील अनेक मुले आणि महिला अशा प्रकारे ऑनलाईन
सेक्सटोर्शनचे प्रशिक्षण घेऊन खंडणी उकळत असल्याचे समोर आले आहे.