बिग बॉसच्या मराठीच्या घरात पहिल्यांदा एका आठवड्यात दोन सदस्य आऊट झालेत.
विकेंडच्या चावडीवर आज अभिनेत्री यशश्री
मसुरकरला घराबाहेर पडावं लागलं.
यशश्रीबरोबर किरण माने, अमृता देशमुख, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी डेंजर
झोनमध्ये होते.
त्यातून यशश्रीला घराबाहेर पडावं लागलं. अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी सेफ
झाल्या.
आता किरण माने आणि अमृता देशमुख यांच्यापैकी
एक जण आऊट होणार आहे.
रविवारी कोणता दुसरा सदस्य घराबाहेर पडणार
याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
यशश्री आऊट झाल्यानंतर ती घरातील कोणत्याही सदस्याला बाय न करता घरातून
निघून गेली.
घरातील सदस्यांना शेवटचं भेट असं सांगूनही ती
कोणाला भेटली नाही.
मात्र घरातून बाहेर पडताना ती सदस्यांना भेटली असती तर खूप इमोशनल झाली असती
आणि मला रडायचं नव्हतं म्हणून मी कोणाला भेटली नाही, असं तिनं महेश मांजरेकरांना
सांगितलं