मुळशीत 7/12 दुरुस्तीसाठी उद्यापासून विशेष सप्ताह

 


पौड - मुळशी तालुक्‍यातील ऑनलाइन 7/12 मधील नावामध्ये, क्षेत्रात, इतर हक्कातील नोंदी, भोगवटादार वर्ग प्रकारामध्ये अनेक तफावती दिसून येत आहेत. या किरकोळ अशा टायपिंग स्वरूपातील चुका मोठ्या प्रमाणात असून याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे मुळशीतील प्रत्येक गावात शासनाच्या वतीने 7/12 चूकदुरुस्ती करिता महाराजस्व अभियान राबवावे याकरिता निवेदन देण्यात आले होते.

दिलेल्या निवेदनाचा अनुषंगाने तहसिलदार अभय चव्हाण यांनी गावकामगार तलाठी आणि मंडल अधिकारी यांना 7/12 चूक दुरुस्ती करिता विशेष सप्ताह आयोजित केला आहे. मुळशीमधील शेतकऱ्यांनी या विशेष सप्ताहचा लाभ घेऊन आपले 7/12 वर झालेल्या चुका दुरुस्त करून घ्याव्यात आणि कामाचा जलद गतीने निपटारा करणेसाठी दि. 1 ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये सेनापती बापट सभागृह पंचायत समिती मुळशी (पौड) या ठिकाणी विशेष उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

मंडलनिहाय आयोजन :
दि. 1 डिसेंबर- घोटावडे मंडल,
दि. 2 डिसेंबर- पिरंगुट मंडल,
दि. 5 डिसेंबर- थेरगाव मंडल,
दि. 6 7 डिसेंबर पौड, माले, मुठा मंडल मधील येणारी तलाठी कार्यालय मधील गावांची चूक दुरुस्ती करिता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..